Help लॉगिन





प्रशिक्षण वैशिष्टे


प्रबोधिनी येथे आयोजित प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये :

  आदिवासी युवकांसाठी ४ महिन्यांचे निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग .

  माहिती अधिकार कायद्याचे प्रशिक्षण देणारी राज्यातील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था.

  अमरावती विभागातील आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था .

  लोकसेवा हमी कायद्यांचा निर्मिती प्रक्रिये पासूनच प्रशिक्षणामध्ये समावेश .

  अमरावती व नागपूर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारांच्या उजळणी प्रशिक्षणाचे आयोजन .

  कार्यालयीन कामकाज करणाऱ्या महिलांचे लैगिक शोशनास प्रतिबंध कायद्याच्या प्रशिक्षणामध्ये समावेश .

  अधिकारी /कर्मचारी यांचे विचार करणायचा प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणणे याकरिता नियमित कालावधीने प्रशिक्षण देणे .

  प्रत्येक दीर्घकालीन पायाभूत व पदोन्नतिनंतरच्या प्रशिक्षणामध्ये खालिलबाबींचा समावेश .

१.  ग्राम नियोजनासाठी लोकसहभागातून ग्रामीण उत्थान (PRA) तंत्राचा वापर .

२.  प्रशिक्षणार्थ्याच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने वझ्झर ता. अचलपूर येथील मतिमंद व अपंग बेवारस मुलांच्या सुधारगृहास व तपोवन सारख्या सामाजिक उपक्रमांना भेट .

३.  प्रशिक्षणार्थच्या शारीरिक क्षमता विकसित होणाच्या दृष्टीने तसेच निसर्ग प्रेम जोपासण्याच्या दृष्टीने मेळघाट भागात पदभ्रमण व साहसी खेळांच्या प्रशिक्षणात समावेश .

४.  रक्तदान शिबीर व श्रमदाना सारख्या उपक्रमाचा प्रशिक्षणामध्ये समावेश.